१२ एप्रिल, २०१२

मजकूर दोन रकान्यात

वर्डमध्ये मजकूर नेहमीच एका पानावर एका रकान्यातच लिहिला जातो. ते सोईस्कर असते. एका पानात दोन रकान्यांमध्येही लिहायचीही सोय आहे.
एका पानात दोन रकाने तयार करण्याच्या पाय-या अशा ः
१. संपूर्ण नवे पान उघडा.
२.  Page layout या टॅबवर क्लिक करा.
३. Orientation, Size, Columns असे तीन पर्याय दिसत आहेत, हे पहा.
४. तिस-या पर्यायावर म्हणजेच Columns वर कर्सर न्या.
५. Split text into two or more columns अशी सूचना दिसत आहे, हे पहा.
६. क्लिक करा.
७.  दुसरा पर्याय म्हणजे Two वर क्लिक करा.
८. समोरील पर्याय गायब होऊन वर्डचे पान दिसत आहे, हे पहा.
९. एखादा मजकूर लिहू लागा.
१०. अक्षरे पानाच्या पलीकडच्या बाजूपर्यंत न जाता मध्येच खाली उतरत आहेत, हे पहा.

( अक्षरांचे पानाच्या मध्यभागी खाली उतरणे, याचाच अर्थ दोन रकाने तयार झाले आहेत. डोळ्यांना ते दिसत नाहीत पण मजकूर लिहीत पुढे गेले की समजते.)

दोन रकान्यांच्या पर्यायाशिवाय इतरही पर्याय उपलब्ध आहेत, हे लक्षात आले असेल.

२ टिप्पण्या:

  1. रकाने दिसायला हवे असतील तर Columns च्या सेटींग्स बदलल्या की त्यांच्या बॉर्डर दिसतात. याचा उपयोग आपल्याला ब्रोशर्स वगैरे तयार करताना होतो. ज्यांना पेजमेकर वरती काम करता येत नाही त्यांना उपयुक्त ठरते.

    प्रत्युत्तर द्याहटवा