२३ ऑगस्ट, २०१२

कात्रीने कापून पहा

एक्सेलमध्ये एखाद्या सेल मधील मजकुराला कापून दुस-या सेलमध्ये ठेवायचे असेल तर सिलेक्ट, कट व पेस्ट  हा नेहमीचा रस्ता झाला. यातील कट साठी एक कात्री दाखवतो. .
पुढील पाय-यांवरून चाला व स्वतःच करून पहा.

१. होम टॅब आधीपासून क्लिक केलेली आहे की नाही, पहा.
२. क्लिक केलेली नसेल तर क्लिक करा.
३. टॅबच्या खाली फॉँट दाखवणारी खिडकी असेल. (Times New Roman, Arial वगैरे)
४. खिडकीच्या शेजारी  एक कात्री आहे, याची खात्री करा.
५. ए १ या सेलमध्ये एक्स लिहा.
६. बी १ या सेलमध्ये वाय लिहा.
७. दोन्ही सेल्स सिलेक्ट करा.
८. कात्रीवर क्लिक करा.
९.याच शीटवरील दुस-या कोणत्याही दोन्ही सेल्स सिलेक्ट करा.
१० .राईट क्लिक करा.
११..पेस्ट करा.
१२. बरोबर दोन सेल्समध्ये मूळच्या दोन्ही सेल्स पेस्ट होतात, हे पहा.

मोठे काहीही नाही. केवळ राईट क्लिक करून कट करावे लागू नये म्हणून एक कात्री दिलेली आहे.

१२ एप्रिल, २०१२

मजकूर दोन रकान्यात

वर्डमध्ये मजकूर नेहमीच एका पानावर एका रकान्यातच लिहिला जातो. ते सोईस्कर असते. एका पानात दोन रकान्यांमध्येही लिहायचीही सोय आहे.
एका पानात दोन रकाने तयार करण्याच्या पाय-या अशा ः
१. संपूर्ण नवे पान उघडा.
२.  Page layout या टॅबवर क्लिक करा.
३. Orientation, Size, Columns असे तीन पर्याय दिसत आहेत, हे पहा.
४. तिस-या पर्यायावर म्हणजेच Columns वर कर्सर न्या.
५. Split text into two or more columns अशी सूचना दिसत आहे, हे पहा.
६. क्लिक करा.
७.  दुसरा पर्याय म्हणजे Two वर क्लिक करा.
८. समोरील पर्याय गायब होऊन वर्डचे पान दिसत आहे, हे पहा.
९. एखादा मजकूर लिहू लागा.
१०. अक्षरे पानाच्या पलीकडच्या बाजूपर्यंत न जाता मध्येच खाली उतरत आहेत, हे पहा.

( अक्षरांचे पानाच्या मध्यभागी खाली उतरणे, याचाच अर्थ दोन रकाने तयार झाले आहेत. डोळ्यांना ते दिसत नाहीत पण मजकूर लिहीत पुढे गेले की समजते.)

दोन रकान्यांच्या पर्यायाशिवाय इतरही पर्याय उपलब्ध आहेत, हे लक्षात आले असेल.

१७ फेब्रुवारी, २०१२

किती लिहिलं मी ?

     संगणकाचा वापर करायला लागल्यापासून स्पेलचेक आणि वर्ड काऊंट करायची येताजाता सवय लागते. [म्हणजे स्वतः नीट स्पेलिंग लिहायचं नाही, भरमसाठ लिहायचं आणि नंतर जबाबदारी संगणकावर ढकलायची.:)]

...तर किती शब्द लिहून झालेत, हे बघण्याची सवय बहुधा word count वर टिचकी मारून झालेली आहे. वर्ड २००७ मध्ये टिचकी कुठे मारायची हे कळत नाही. सर्व मेनू आणि सबमेनू शोधून होतात.

     सोपे आहे.
वर्डफाईल संगणकावर खालच्या बाजूला जिथे संपते तिथे थेट आकडाच दिसतो. ती ओळ साधारण अशी दिसतेः
Page 1 of 1 | Words : 102| English (U.S.) | 
    102 च्या जागी तुम्ही जितकं लिहिलं असेल ती संख्या.