०१ डिसेंबर, २०११

पानाला आडवे करा !

वर्ड संदर्भात पानाचे ओरिएंटेशन म्हणजे पान उभे (Portrait) असावे की आडवे(Landscape). सहसा पान उभेच असते. क्वचित् आपल्याला ते आडवे हवे असते.
पान उभ्या स्थितीत असेल तर ते आडवे करण्याची रीत अशी :

१.  वर्डचे एखादे पान उघडा. 
२. मुख्य मेनूबारवरील तिसरा पर्याय Page Layout वर क्लिक करा.
३. Page Layout या शब्दाच्या खाली Orientation, Size, Columns असे तीन शब्द आले आहेत, याची खात्री करा.
४. Orientation शब्दावर क्लिक करा.
५. Portrait आणि Landscape हे दोन पर्याय दिसत आहेत, याची खात्री करा.
६. Landscape वर क्लिक करा.
७. क्लिक करताक्षणी पानाच्या आकारात बदल झालेला दिसत आहे, याची खात्री करा.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा