०२ जून, २०११

प्रिंट ले आऊट सर्वात आवडता

वर्डला तीन वेगवेगळे View Format असतात. Normal, Print Layout, Outline. मी अनेकांना विचारले की, कोणता प्रकार जास्त आवडतो. बहुतेकांनी Print Layout हेच उत्तर दिले. आपण लिहिलेला मजकूर अंतिम पानावर कसा दिसेल, याची उत्सुकता ब-याच जणांना असते, हे त्यामागचे कारण असावे बहुतेक. यदाकदाचित् मजकूर छापायची वेळ आलीच तर छापलेल्या पानावर मजकुराची सुरुवात कुठे झाली, कडेपासून किती अंतर घेतले होते हे आधीच कळण्यची सोय या लेआऊट मध्ये आहेत.