१८ जानेवारी, २०११

वर्ड २००७ मध्ये मराठीत लिहिता येते !

   वर्डच्या पूर्वीच्या आवृत्ती युनिकोडला अनुकूल नव्हत्या. मराठीत वर्डमध्ये लिहिणे ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती. फोनेटिक कीबोर्ड वापरून महत्प्रयासाने मजकूर लिहावा लागत असे. लिहायचं, मग फाईल बंद करून पुन्हा उघडून पाहायची, दुस-या कॉम्प्युटरवर ती उघडत आहे का हे पाहायचं, मेलमधून एखाद्याला ती फाईल पाठविल्यास ती त्याच्याकडे उघडते का हे पाहायचं....ही सगळी कर्मकहाणी वर्डच्या नेहमीच्या उपभोक्त्यांना माहीतच आहे.  
    अगदी वर्ड २००३ पर्यंत हे होत होतं. 
    पण आता..सण साजरा करावा अशी बातमी आहे.
    वर्ड २००७ युनिकोड तंत्रज्ञानाला पाठिंबा देते !
    युनिकोड असेल आणि वर्ड २००७ असेल तर आता तुम्ही मराठीत पाहिजे तितके लिहू शकता. मग ती कथा असो व कार्यालयीन अहवाल !  

४ टिप्पण्या:

  1. केदार ,२००७ मध्ये मराठी लिहिता येते हे बरोबर आहे परंतु ते कसे लिहायचे त्याची माहिती तु लिह.
    तुझा मित्र,
    केदार लसणे
    http://mahapooja.blogspot.com
    http://dailypctrick.blogspot.com
    आवश्य पहा

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. केदार, धन्यवाद.एकदा युनिकोड लावून घेतल्यानंतर दोन भाषापट्ट्या मिळतात. आपापसात त्यांची अदलाबदली करता येते. मराठी भाषापट्टी निवडल्यास कळफलकाचे रुपांतर मराठीत होते. त्यानंतर टायपिंग सुरु करता येते. कळफलकावर सरावाने प्रभुत्व मिळवता येते.

    प्रत्युत्तर द्याहटवा
  3. मित्रा, वर्डच्या पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये मराठी लिहिणे अशक्य होते, हे तुमचे म्हणणे चुकीचे आहे. मी स्वतः वर्डच्या 97 व 2003 या दोन्ही आवृत्त्यांमध्ये काम केले असून मराठीत युनिकोडमध्ये त्या व्यवस्थित टाईप करता येतात. हे स्वानुभवावरून सांगतो. मात्र, त्यात काही अडचणी येतात हे मान्य. परंतु मराठीत लिहिणे अशक्यच हे मात्र चुकीचे वाटते.
    फक्त आपल्या माहितीसाठी हे लिहित आहे.

    प्रत्युत्तर द्याहटवा