१८ जानेवारी, २०११

वर्ड २००७ मध्ये मराठीत लिहिता येते !

   वर्डच्या पूर्वीच्या आवृत्ती युनिकोडला अनुकूल नव्हत्या. मराठीत वर्डमध्ये लिहिणे ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती. फोनेटिक कीबोर्ड वापरून महत्प्रयासाने मजकूर लिहावा लागत असे. लिहायचं, मग फाईल बंद करून पुन्हा उघडून पाहायची, दुस-या कॉम्प्युटरवर ती उघडत आहे का हे पाहायचं, मेलमधून एखाद्याला ती फाईल पाठविल्यास ती त्याच्याकडे उघडते का हे पाहायचं....ही सगळी कर्मकहाणी वर्डच्या नेहमीच्या उपभोक्त्यांना माहीतच आहे.  
    अगदी वर्ड २००३ पर्यंत हे होत होतं. 
    पण आता..सण साजरा करावा अशी बातमी आहे.
    वर्ड २००७ युनिकोड तंत्रज्ञानाला पाठिंबा देते !
    युनिकोड असेल आणि वर्ड २००७ असेल तर आता तुम्ही मराठीत पाहिजे तितके लिहू शकता. मग ती कथा असो व कार्यालयीन अहवाल !