२३ जुलै, २०१३

नोटपॅड..एक मध्यस्थ


    कित्येकदा आउटलूक एक्सप्रेसमध्ये किंवा मायक्रोसऑफ्ट आऊटलूक मध्ये आपल्याला एखादा मजकूर दुसरीकडून कॉपी करून पेस्ट करायचा असतो. नव्या मेलचा मजकूर एखाद्या पूर्वीच्या मेलसारखाच असतो. टाईप करत बसण्यापेक्षा आपण उचलेगिरी करतो. सिलेक्ट, कॉपी आणि पेस्ट या नेहमीच्या रस्त्याने आपण जातो. मजकूर बरेचदा वाकडातिकडा पेस्ट होतो. शिवाय, कधीकधी त्याची रचना बदलते. अक्षरशैली, आकार या बाबीही बदलतात. असे होणे आपल्याला अपेक्षित नसते. मजकूर जेथून कॉपी पेस्ट केला तेथून तसाच्या तसा पेस्ट व्हावा, अशी आपली अपेक्षा असते पण तांत्रिक पार्श्वभूमी सर्वत्र सारखी नसल्याने मजकुराचे बारा बाजतात आणि मजकूर हवा तसा बनविण्यासाठी आपण त्याच्याशी  झटापट करीत बसतो.
    यावर एक उपाय आहे. मजकूर कॉपी करावा व नोटपॅड मध्ये पेस्ट करावा. तसे केल्याने नोटपॅड त्याची मूळची रचना बदलून टाकते व त्याला पूर्ण शुध्द रुपात आणते. येथून मजकूर पुन्हा कॉपी करावा मेलमध्ये पेस्ट करावा. पेस्ट केल्यावर जे स्वरुप असते ते बरेचदा आपल्याला  हव्या त्या रचनेसारखे असते. किरकोळ फरक किंचित मेहनत घेऊन दर करता येतो.
    इंग्रजी मजकूराबाबत हे घडतेच पण मराठी मजकुरासंदर्भात ही बाब विशेषत्वाने जाणवते. दोन पक्षांमधील तंटे सोडविण्यासाठी एखाद्या त्रयस्थाची मध्यस्थ या नात्याने मदत घेतली जाते, हे सामाजिक सत्य येथे ध्यानात येण्यास हरकत नाही. समाज असो वा तंत्रज्ञान, जगात तत्त्वे सारखीच.

   

1 टिप्पणी:

  1. सहमत.... मी पण अशा प्रकारे नोटपॅड वापरते ब-याच वेळेला.

    तुम्ही माझ्या ब्लॊग वर प्रश्न विचारला होता, त्यावर तिकडेच उत्तर दिले तर तुम्हाला ते पोचेल की नाही हे माहीत नाही. म्हणुन इथे इत्तर देते.

    गझल - जगजित च्या ब-य़ाचशा, प्रेमभंग वगैरे काळात सगळ्या रडक्या आवडायच्याच. पण तरी साकी/जाम वगैरेवाल्या विशेष आवडत नाहीत.

    प्रत्युत्तर द्याहटवा

Astrological Consultations available

Astrological consultations available. Contact : kedarcpatankar@gmail.com